उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका थांबवा अन्यथा उडता मातोश्री चित्रपट जगासमोर आणू
भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात
कणकवली (प्रतिनिधी): काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर किती दगड किती मारावे त्याला मर्यादा आहेत.नाईट लाईफ, ड्रॅग अमली पदार्थ म्हटले की संजय राऊतच्या मालकाच्याच मुलाचे नाव येते.ड्रग मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावरन सुरवात करा. दिनोच्या घरी धिंगाणा कोण घालत होता.जुन्या महापौर बंगल्यात पुण्या पारेख,राहुल गोम,दिनो मोरया,खेर नावाची अभिनेत्री का यायची ? कोणाला भेटायची ? दिनोच्या घरी कोणाचा वाइन चा ग्लास भरला जायचा ? या सर्वांची संजय राजाराम राऊत ने मालकच्या मुलाला विचारून उत्तर द्यावीत आणि मगच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करावी.नाहीतर उडता मातोश्री चा चित्रपट जगासमोर आणू असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला. ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बॉटल सापडलेल्या त्या कोणाच्या होत्या ?बमबम भोले गाणे कोणाच्या घरी वाजत ते सांगू काय ? तेव्हा तुझ्या मालकाचा मुलगा तुला चपलीने मारेल मग मला दोष देवू नको. म्हणून नाशिक मध्ये नको तर मातोश्रीवर मोर्चा काढ असा उपरोधिक सल्ला दिला.अभिनेता खुनाच्या बाबतीत आदित्य ठाकरे चा काही ना काही रोल आहे. म्हणून तर त्याला कोर्टात जावं लागल असे सांगताना आमदार राणे म्हणले,चमच्याचे नाव बदलून संजय राऊत ठेवावं लागेल.जो चमचेगिरी करतो त्यात पीएचडी केली आहे त्याने दुसऱ्यांना बोलू नये. माझी टीका नीलम गोरे व मिलिंद नार्वेकर यांचेवर नहोती तर ते कोणाचे आदेश पाळायचे त्या उद्धव ठाकरेंची चौकशी केली तर दंगली थांबतील. मिडीया समोर भांडण्यापेक्षा एकत्र बसू मराठा आरक्षणातील अडचणी सोडवू
वास्तुस्तिथी मांडण ही चूक आहे का? राणे साहेबांनी जे सल्ले दिलेत ते समाजाने ते स्वीकारले आहेत.त्यांनी आरक्षण अहवाल देताना अनेक गोष्टींचा अभ्यास केला आहे.त्यामुळे त्यांचे काय म्हणणे आहे आणि समाजापुढे कोणत्या अडचणी येणार नाहीत याचा विचार झाला पाहिजे.सोशल माध्यमातून राणे साहेबांचे कौतुक देखील झाला आहे.सर्वांनी एकत्र बसावं जरांगे-पाटीलांनी आमच्या घरी यावं मी त्यांना निमंत्रित करतो आपण सर्वजण समाज बांधव म्हणून एकत्र बसू आणि समाजाचे हित काय आहे ते ठरवू.२४ तासासाठी आरक्षण आम्हाला नको तर पिठ्यांपिढ्या टिकेल असे आरक्षण हवे.आणि ते आमचे सरकार असे आरक्षण देणारे आहे.त्याचा फायदा घ्यावा.माझ्या वडील केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलं आहे. हा मला अभिमान आहे. तसा अभिमान रोहित पवार कोणाचा दाखवतील का ? त्यांनी सांगावे समाजासाठी काय केले ते. समाज बांधव म्हणून एकमुखी विचार करावा लागेल. मिडीया समोर भांडण्यापेक्षा एकत्र बसू असेही यावेळी नितेश राणे यांनी सांगितले. आमच्या माता ,देवींना शिव्या घालणाऱ्या अंधारे ताई आता नमस्कार का करत आहेत. तुमचे पण काही व्हिडिओ दाखवले तर ?? शिवसेनेच्या नेत्या अंधारे सारख्या उबाठा मध्ये कंत्राटी कामागर खूप घेतलेल्या आहेत. अंधारे अजून उद्धव ठाकरेंना ओळखत नाहीत.आणि त्यांच्या सारखे मी भाषण करताना स्टूल वर उभा राहत नाही.सुषमा ताईंना कोणीही धमकी देत नाही तसे असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी.