कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जयकुमार शिंदे यांचा मुलगा सूरज जयकुमार शिंदे (वय २७) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने जयकुमार शिंदे यांच्यावर ओढवलेल्या घटनेबद्दल राजकीय, सामाजिक, आणि सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सुरज शिंदे यांनी संभाजीनगर येथील ओम गणेश काॅलनी येथील राहत्या घरी किचन मधील फॅनला गळफास लावून घेतला. त्याच्या नातेवाईकांनी गळफास अवस्थेत खाली काढून सुरज यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचारच दाखल केले. पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी सीपीआर पोलीस चौकी येथे नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.











