साळेल येथील तळीचा वहाळात आढळली पाच फूटी मगर

ग्रामस्थांनी पकडून दिली वनरक्षकांच्या ताब्यात – गावात चर्चा

चौके (अमोल गोसावी) : शनिवारी रात्रौ साळेल येथील काही युवक खेकडे पकडण्यासाठी साळेल वरचीवाडी येथील तळीचा वहाळ गणेश विसर्जन ठिकाणी गेले असता वहाळाच्या ओढ्यात भली मोठी साधारण पाच फूटी मगर दिसून आली.युवकानी सदर मगरीची कल्पना गावातील इतराना दिली.त्यानंतर वनविभागाचे श्री.कांबळे याना बोलवून ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने मगरीला जेरबंद करुन त्यांच्या ताब्यात दिली.रात्री उशीरा
मगरीला धामापूर तलावाच्या अधिवासात सोडण्यात आले.

सदर मगरीला पकडण्यासाठी सरपंच रविंद्र साळकर,रोशन गावडे,प्रशांत मिठबावकर,प्रकाश घाडी,चिन्मय तावडे.आबा घाडी.मंगेश जामदार,नंदू गावडे,संजय गावडे,साबाजी गावडे,लवकेश साळकर,प्रमो जामदार,प्रकाश गावडे,गणेश गावडे,बाबू घाडी,कमलेश साळकर,निलेश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गावात एकच चर्चा मगर आलीच कशी?
रस्त्यालगत असलेल्या गणेश विसर्जन होणाऱ्या तळीचा वहाळ येथे पाच फूटी भली मोठी मगर या वहाळाच्या पाण्यात आलीच कशी? मगरीचा कुतुहलाचा विषय असल्याने याची रविवारी दिवसभर चर्चा चालू होती.

error: Content is protected !!