आमदार नितेश राणेंकडे सुरेश उर्फ बाळा मोरये यांची मागणी
नांदगाव (प्रतिनिधी): विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नावाने नांदगाव तिठा उड्डाणपुलाखालील चौकाचे नामकरण करावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे आमदार नितेश राणे यांच्याकडे नांदगावचे ग्रामस्थ सुरेश उर्फ बाळा मोरये यांनी केली आहे. पत्रात मोरये यांनी म्हटलं आहे की केंद्रीयमंत्री राणेंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास खऱ्या अर्थाने झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव तिठा फ्लायओव्हर ब्रिजखालील चौक हा देवगड निपाणी राज्य महामार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे.फ्लायओव्हर मुळे या चौकाला वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. तरी या चौकाला सिंधुदुर्ग चे शिल्पकार नारायण राणेंचे नाव द्यावे.












