कणकवली नांदगाव ओटव माईन एसटी बस सुरू

माईन सरपंच नितीशा पाडावे यांचा यशस्वी पाठपुरावा

कणकवली (प्रतिनिधी): कोव्हीड – 19 काळात बंद करण्यात आलेली कणकवली नांदगाव ओटव मार्गे माईन एसटी बसफेरी 3 वर्षानंतर सुरू करण्यात आली असून यासाठी माईन सरपंच नितीशा नितीन पाडावे यांनी घेतलेल्या मेहनतीला यश आले आहे.कोव्हीड -19 काळात कणकवली डेपोतून नांदगाव ओटव मार्गे माईन जाणारी एसटी बस फेरी रद्द करण्यात आली होती. मागील 3 वर्षे ही एसटी बस फेरी बंद होती.माईन सारख्या दुर्गम भागातून एसटी शिवाय अन्य कोणतेही खाजगी वाहन सुद्धा ये जा करण्यासाठी उपलब्ध नाही.त्यामुळे माईन सारख्या दुर्गम खेड्यातील प्रवासी, नागरिक आणि शालेय व कॉलेज मधील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. कोव्हीड नंतर सदर एसटी बस फेरी सुरू करावी यासाठी मागील वर्षभर माईन सरपंच नितीशा पाडावे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. एसटी डेपो मॅनेजर पासून विभाग नियंत्रकांपर्यंत लेखी पत्रव्यवहार करून सदर एसटी बस फेरी सुरू करावी यासाठी सातत्याने आवाज उठवला होता.अखेर सरपंच पाडावे यांच्या मागणीला यश आले असून कणकवली नांदगाव ओटव मार्गे एसटी बस फेरी सुरू झाली असून याबद्दल प्रवासी ग्रामस्थ तसेच विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!