शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : रंगोत्सव सेलीब्रेशन टॅगलाईन वर आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत कनेडी हायस्कुल मधील विद्यार्थी स्वराज विठ्ठल चव्हाण याने गोल्ड मेडल सह सिल्वर मेडल वर आपले नाव कोरले. स्वराजच्या या उत्तुंग यशाची दखल घेत शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी स्वराज याचे विशेष कौतुक करत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कणकवली येथील सावंत यांच्या निवासस्थानी स्वराज ला सन्मानाने शाल पांघरून सत्कार केला. यावेळी स्वराज चे वडील विठ्ठल चव्हाण, मयूर ठाकूर उपस्थित होते.
स्वराज हा विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे चौथी मध्ये शिकत असताना त्याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. स्वराज यास चित्रकलेची आवड असून विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात त्याचा हातखंडा आहे. विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे त्याच्यावर चित्रकलेचे उत्तम असे संस्कार झाले आणि त्यामुळेच त्याला अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेच्या माध्यमातून गोल्ड मेडल तसेच सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे. स्वराज हा आता माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे इयत्ता पाचवी मध्ये पुढील शिक्षण घेत असून तेथे देखील चित्रकला शिक्षकांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या चित्रकला स्पर्धा तसेच चित्रकलेतील बारकावे तो शिकत आहे. अशा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेच्या माध्यमातून गोल्ड मेडल प्राप्त केल्यामुळे नेते सतीश सावंत यांच्याकडून नुकताच स्वराज विठ्ठल चव्हाण याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना सतीश सावंत यांनी कु स्वराज यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून भावी शैक्षणिक वाटचालीस सहकार्य करण्याचे आश्वाशन देखील दिले. यानिमित्ताने स्वराज विठ्ठल चव्हाण याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.












