राज्यस्तरीय महाआवास योजनेत लोरे नं 2 ग्रामपंचायत राज्यात प्रथम

लोरे नं 2 गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : पंतप्रधान महाआवास योजनेत राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 ग्रामपंचायत ने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्याचे ग्रामविकासमांत्रि गिरीश महाजन यांच्या हस्ते लोरे नं 2 ग्रामपंचायत ला मुंबईत सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळविण्यात लोरे नं 2 गावचे माजी सरपंच, माजी ग्रामसेवक श्रीमती हांडे, ग्रामसेवक कांबळे तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब , विस्तार अधीकारी, समस्त लोरेवासीय यांनी मार्गदर्शन व  सहकार्य  केले आहे.सर्वांच्या एकजुटीने हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया लोरे नं 2 चे सरपंच विलास नावले यांनी दिली.

error: Content is protected !!