कार्तिकी एकादशीला रविराज चीपकर यांनी साकारले श्री विठ्ठलाचे वाळू शिल्प…..!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले आरवली, सोनसुरा येथील युवा वाळू शिल्पकार  रविराज चिपकर यांनी आज सागरतिर्थ समुद्रकिनारी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे सुंदर असे वाळू शिल्प साकारले आहे. हे वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रविराज चिपकर युवा वाळूशिल्प कलाकार आपल्या कलेतून विविध वाळू शिल्पे साकारत असतात. त्यांची सर्वच वाळू शिल्पे आकर्षक व सुंदर असतात. आज रेखाटलेले हे वाळूशिल्प ही सुंदर आहे. ते पाहण्यासाठी ग्रामस्थ समुद्रकिनारी गर्दी जमत आहे

.

error: Content is protected !!