माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे निधन

नाटळ येथील स्मशानभूमीत होणार 5.00 वाजता अंत्यसंस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका कणकवली येथील नाटळ गावचे रहिवासी माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी निधन. त्यांच्या मूळ गावी नाटळ येथे सायंकाळी 5.00 वाजता त्यांच्यावर ती अंत्यसंस्कार होणार आहेत. भारतीय सेना दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वैभववाडी व कणकवली येथे आपले स्वतःचे क्लिनिक चालवले सर्वत्र त्यांना डॉक्टर खरात म्हणून ओळखले जात होते. सामाजिक चळवळीत देखील त्यांनी घेतलेला सहभाग समाजासाठी प्रेरणादायी होता.समाजाला उन्नती कडे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. 1986 ते 1987 च्या सुमारास डॉक्टर बी आर खरात आणि सीताराम बोडके बि एन वराक त्यांच्या सारख्या असंख्य सहकारी यांच्या सोबतघेऊन सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजसेवा संघाची अधिकृत नोंदणी करून खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजसेवेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यावेळी रस्ते नसताना प्रत्येक वाडीवस्तीवर पायपीट करीत जाऊन लोकांच्या मीटिंग घेणे, लोकांना समाजसेवेचे महत्त्व पटवून सांगणे,त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन अतिशय दुर्गम भागात शाळा, पाणी , लाईट ची व्यवस्था करण्यासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्यांपैकी एक प्रकारे व्यक्तिमत्व डॉक्टर बी आर खरात यांनी सकाळी 05.00 वाजताच्या सुमारास डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल कणकवली येथे उपचार घेत असताना शेवटचा श्वास घेतला. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात डॉक्टरांची व्यवस्था नव्हती अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बी आर खरात यांनी त्यांना सैन्यांमध्ये असलेल्या प्रदीर्घ अनुभवावर ग्रामीण भागातील आजारी पडणाऱ्या लोकांवर उपचार करण्याचे धाडस केले त्यामुळे त्यांच्या वैभववाडी कणकवली येथील निवासस्थानी आजाराने त्रस्त असणाऱ्या लोकांची रीग लागत असे. डॉक्टरीपेशा आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे त्यांचा मित्र परिवार ही मोठा होता त्यांच्या अकाली निधनामुळे सर्व मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली, नातवंडे, नातेवाईक असा मोठा परिवार आहे. डॉक्टर बी आर खरात हे धनगर समाजातील थोर क्रांतिकारक कै.नवलु जानू काळे(सडूरे-सोनधरणे ता.वैभववाडी) यांचे जावई होत. परोपकारी आणि समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या डॉक्टर बी आर खरात यांना ” भावपूर्ण श्रद्धांजली”.

error: Content is protected !!