पीएम मोदींचे स्वागत करण्याचा क्षण सर्वोच्च आनंददायी – नामदेव जाधव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नौसेना दिनानिमित्त चिपी विमानतळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करण्याची अमूल्य संधी मला मिळाली.हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंददायी असल्याची भावना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी व्यक्त केली.4 डिसेंबर रोजी नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी चिपी विमानतळावर माननीय पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी महनीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भाजपाचे आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपाचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते. पीएम मोदींचे स्वागत करणाऱ्या एकूण 12 सदस्यांमध्ये नामदेव जाधव होते.थेट पीएम मोदींना एवढ्या जवळून पाहता येणे, त्यांची भेट घेता येणे आणि प्रत्यक्ष त्यांचे स्वागत करणे हे स्वप्नवत होते. मात्र हे स्वप्न भाजपा आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्यामुळे शक्य झाल्याचेही जाधव म्हणाले.

error: Content is protected !!