ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) :२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिना” निमित्त ग्राहक पंचायत-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३” चे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीव व्हावी, ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या प्रसाराबरोबरच शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर निबंध स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन गट, महाविद्यालय गट व खुला गट अशा तीन गटात आयोजित केली असून निबंध स्पर्धेचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे
१) पहिला गट- कनिष्ठ महाविद्यालयीन गट (इयत्ता ११ वी व १२ वी)
विषय- ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि ग्राहक चळवळ.
शब्दमर्यादा २०० ते ३००
२) दुसरा गट- महाविद्यालय गट
विषय- ऑनलाईन खरेदीचे फायदे-तोटे.
शब्दमर्यादा- ३०० ते ४००.
३) तिसरा गट- खुला गट
विषय- सजग ग्राहक म्हणून माझी जबाबदारी.
शब्दमर्यादा- ४०० ते ५००.
स्पर्धकांनी आपला निबंध स्वच्छ अक्षरात पानाच्या एका बाजूला लिहिलेला असावा. स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, वर्ग, कनिष्ठ किंवा महाविद्यालयाचा पूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक स्वतंत्र पानावर लिहावा. निबंध दिनांक १५ डिसेंबर पर्यंत संस्थेच्या खालील पत्त्यावर पाठवावेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख रु.५०१/-, ३०१/- व २०१/- व प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय ग्राहक दिनी गौरविण्यात येणार येईल. स्पर्धकांनी आपले निबंध ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस. एन.पाटील मु. पो. ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग 416 810 या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रा.एस.एन.पाटील (9834984411), उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे (9689077595), संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर (9422239090) व सचिव श्री.संदेश तुळसणकर (9420100946) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.