नौदल दिन सुयोग्य नियोजन करून यशस्वी केल्याबद्दल किशोर तावडे, सौरभ अग्रवाल, अजय सर्वगोड यांचा विशेष सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नौदल दिन हा राष्ट्रीय कार्यक्रम सुयोग्य नियोजन करून यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड यांचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी विशेष सत्कार केला. न्यायालयाने प्रशासन अधिकाऱ्यांची घेतलेली दखल ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने याबाबत सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश वर्ग २ श्रीमती व्ही एस देशमुख, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस के कारंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश अनिता कुरणे, महाराष्ट्र गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ऍड संग्राम देसाई, व्यवस्थापक प्रशांत माळकर ,अधिक्षक भाग्यवंत वाडीकर, रजिस्टार सुकांत सावंत, यांच्यासह न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!