द आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): द आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन च्या माध्यमातून युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर दिनांक 27 डिसेंबर ते 3 जानेवारी 2024 पर्यंत गोपुरी आश्रम कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे यामध्ये वकृत्व कौशल्य, समय सूचकता, आत्मविश्वास , स्मरणशक्ती विकास, वैचारिक प्रगल्भता, निरोगी शरीर, स्वस्थ मन, या आपल्याला उत्कर्षाच्या दिशेने येणाऱ्या गोष्टी साधता येतील. तर ढासळता आत्मविश्वास, नाराज ,असमाधान, सारखा अविश्वास, चुकणारे निर्णय, करिअरचे टेन्शन, गोंधळलेले मन, अशांत मन, सततच भय, उदास मन, सततच शंका, निराशा, अपयश, भकास विचार, अपेक्षाभंग, अपूर्ण इच्छा, अमर्याद गरजा, कृतिशून्य शरीर, नेहमीची चिंता यांसारख्या आपला आत्मविश्वास ढासळणाऱ्या गोष्टीं दूर लोटता येतील. यासाठी तुकाराम जावळे काका सिनियर प्रशिक्षक व मास्टर ट्रेनर Y.L.T.P. यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. योगा ध्यान गाणं व सुदर्शन क्रिया या माध्यमांतून आठ दिवसात शरीर आणि मन नक्की बदलेल. जेवण, नाश्ता, राहणे सर्व मिळून डोनेशन फक्त 2000/- असून रिपोर्टिंग 27 डिसेंबर दुपारी 4:00 वाजेपर्यंत करावे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठी https://aolt.in/748418 या लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे अधिक माहितीकरता खालील संपर्क क्रमांक वरती संपर्क साधावा उमेश 7798100141 आणि आनंद 9970582365

error: Content is protected !!