संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी संतोष किंजवडेकर यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी यांनी देवगड तालुका संजय गांधी निराधार समितीची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार देवगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची निवड करण्यात आली आहे. जिल्हधिकारी किशोर तावडे यांनी निवड केलेल्या समितीची यादी जाहीर केली असून या समितीच्या अध्यक्षपदी संतोष किंजवडेकर तर सदस्यपदी अमित साळूंखे (मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी), संजना आळवे (महिला अशासकीय प्रतिनिधी), संतोष जंगले व प्रकाश जंगले(इतर मागासवर्गीय वि.भा.ज.प्रवर्गातील दोन अशासकीय प्रतिनिधी), सुहास मनोहर राणे(सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी), भालचंद्र मांजरेकर(अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी), वैभव करंगुटकर(संबंधित तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी), शैलेश लोके(संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ति, अशासकीय प्रतिनिधी), रमेश सावंत(संबंधित तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, अशासकीय प्रतिनिधी) यांची निवड करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य शासकीय प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी पं.स.देवगड, मुख्याधिकारी न.पं.देवगड व तहसिलदार/नायब तहसिलदार राहणार आहेत.

error: Content is protected !!