ग्रामपंचायत पळसंब व विवेकानंद नेत्रालय कणकवली यांचे संयुक्त आयोजन
नेत्र रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा– सरपंच महेश वरक यांचे आवाहन
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत पळसंब व एल. एन, सी, ई, मिरज व नँब नेत्र रूग्णालय संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या सहकार्याने शनिवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 वा यावेळेत मोफत नेत्रतपासणी शिबीर पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं 1 येथे आयोजित केले आहे.
रुग्णालयाची खास वैशिष्ट्ये, फेको पध्दतीने मोतिबिंदू शस्रक्रीया माफक दरात, यशस्वी फेको शस्रक्रियेचा प्रदिर्घ अनुभव, नामवंत नेत्र तज्ञ, प्रशिक्षित स्टाप व्दारे नेत्र तपासणी, अल्प दरात चष्मे उपलब्ध, माफक दरात दर्जेदार शस्रक्रीया अशी असून जास्तीत जास्त नेत्र रूग्णांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच महेश वरक व ग्रामपंचायत पळसंब यांनी केले आहे.












