जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डे ज्यु कॉलेजची कु.भक्ती मांजरेकरचे प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डे ज्यु.कॉलेजची कु.भक्ती मांजरेकर हिच्या निबंधाने महाविद्यालयीन गटात अव्वल स्थान पटकाविले आहे. २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कु. भक्ती मांजरेकर हिने ‘ ग्राहकतीर्थ बिंधूमाधव जोशी व ग्राहक चळवळ ‘ या विषयावर निबंध सादर केलेला होता.ग्राहक पंचायत महाराष्ट्र कणकवली शाखेचे सहसचिव प्रा. विनायक पाताडे व मराठी विभागातील शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कु.भक्ती लाडचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, प्राचार्य एम. डी. खाडये, प्रभारी मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर ,पर्यवेक्षक एस डी भोसले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,राज्य सदस्य व जिल्हाध्यक्ष एस एन पाटील यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!