माजी आम. प्रमोद जठार यांचे सिद्धिविनायक चरणी साकडे
कणकवली (प्रतिनिधी) : बाप्पा…सिद्धीविनायका..माझ्या कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येऊ दे, माझे कोकण आणि कोकणी माणूस आर्थिक संपन्न समृद्ध होऊ दे, कोकणातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळू दे असे साकडे भाजपचे माजी आमदार तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी प्रभादेवी मुंबई येथील सिद्धीविनायक चरणी घातले. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात आज मंगळवारी पत्नी नीरजा, चिरंजीव अभिषेक यांच्यासह दर्शन घेतले. यावेळी बबलू सावंत, सुनील खाडये उपस्थित होते.