राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे दि.१८ ते २० जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या सब ज्युनिअर राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यात आली. एच पी सी एल सभागृह, कणकवली कॉलेज येथे कणकवली तालुका तायक्वांडो असोसिएशन व तायक्वांडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या आयोजनात जिल्हास्तर सब ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी संघटना अध्यक्ष संदेश पारकर,सचिव भालचंद्र कुलकर्णी,कणकवली आगार व्यवस्थापक श्री पाटील, जिल्हा पदाधिकारी विनायक सापळे, अमित जोशी,आयोजक तालुका सचिव एकनाथ धनवटे,अच्युत वणवे,नितीन तावडे,जयश्री कसालकर मंदार परब,ऍड.अक्षय कुळकर्णी,सचिन टेंबवलकर ओंकार सावंतअविराज खांडेकर,अंकुर जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.या निवड चाचणी साठी जिल्हाभरातून १४२ खेळाडू सहभगी झाले.

राज्य स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे
मुले – कु. वंश कोचरेकर, दिव्येश तेंडुलकर,अथांग सावदे,रूनमय शिरवळकर,विघ्नेश पावसकर,पार्थ राणे,कौशिक आबदार, लतिकेश धनवटे, श्रेयस पुजारे, सविनय जाधव,ओंकार पाटील, कुणाल गौंडळकर, जैत्र पटेल,प्रदुमन मुलदेकर
मुली – वृध्दी घाडी,अद्विका पाटील,आराध्या सातवसे,जान्हवी कातवनकर,अनुश्री पुजारी,किमया सावंत,दुर्वा पवार,दिपश्री तेंडुलकर,प्रथा पटेल,सुमन मानगावकर, ऋचा चव्हाण,स्पृहा राणे, मृणाल पाटील,गीत पवार
पुमसे साठी – कु. लौकिक मुंडले
टीम व्यवस्थापक मंदार परब
टीम कोच – अविराज खांडेकर कु.भावना ठाकुर
निवड झालेली टीम राज्य स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. स्पर्धा नी यशस्वितेसाठीअंकुर जाधव, कु भाग्यश्री जाधव कु. दिक्षा पारकर,दर्शन धुरी , ओमकार सावंत,कु सोनिया ढेकणे,ऋतुजा शिरवळकर,वेदांत धनवटे,प्रणव कुडाळकर यानी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!