कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण बाजारपेठ नजीक व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर फूड अँड ड्रग्ज खात्याचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांनी आज सायंकाळी छापा टाकून विमल गुटखा तसेच व्ही वन चा 53 हजार 260 रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. खारेपाटण बाजारपेठ नजीक अब्दुल गनी यांच्या गोडाऊनवर एफ अँड डी चे अन्न सुरक्षा अधिकारी साळुंखे यांनी आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.गोडाऊनमध्ये अवैध गुटख्याची एकूण 520 पाकिटे आढळून आली. हा सर्व मुद्देमाल जप्त करून संशयित अब्दुल गनी याला ताब्यात घेत फूड अँड ड्रग्ज चे अधिकारी साळुंखे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात आणले. अवैध गुटखा बाळगल्याप्रकरणी अब्दुल गनी याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
खारेपाटण मध्ये गुटखा गोडाऊनवर छापा ; 53 हजार 260 रुपयांचा गुटखा जप्त
