श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे होणार कुडाळ येथे आगमन..

कुडाळ (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे 25 जानेवारी रोजी कुडाळ येथे आगमन होणार आहे . गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर नाबरवाडी ते गुलमोहर पर्यंत ढोलताशांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

रात्री 8 वाजता पावशी येथील विनायक केसरकर यांच्या श्री स्वामी समर्थ या निवासस्थानी पालखी व पादुकांचे दर्शन व महाप्रसाद होणार आहे. पालखी रात्री मुक्कामास राहणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विनायक केसरकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!