सिद्धेश महाजन यांची भाजप बांदा मंडलच्या “मन की बात प्रमुख”पदी नियुक्ती

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या बांदा मंडल अंतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत असून, सिद्धेश काशिराम महाजन यांची भाजप बांदा मंडलच्या “मन की बात प्रमुख” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भाजप बांदा मंडल अध्यक्ष मधुकर मोहन देसाई यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.सिद्धेश महाजन हे पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असून स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बांदा मंडलातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे तसेच “मन की बात” कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले.नियुक्तीनंतर सिद्धेश महाजन यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. पक्षाची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!