नियोजित तळेरे तालुका कृती समिती व ग्रामपंचायतीतर्फे आयोजन
तळेरे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांची महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल नियोजित तळेरे तालुका कृती समिती आणि तळेरे ग्रामपंचायत यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता जाहिर भव्य सत्काराचा कार्यक्रम तळेरे एस.टी.स्टॅण्ड समोरील ब्रीजखालील छत्रपती शिवाजी महाराज रंगमंच येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सत्कार सोहळ्याला गावच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गावातील काही प्रमुख समस्या बाबत लेखी निवेदन देण्यात येणार आहे. तरी या प्रसंगी तळेरे गावातील सर्व ग्रामस्थ, गावातील विविध सामाजिक संस्था, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बचत गट यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नियोजित तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत (राजू) जठार, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी पं.स.सभापती दिलीप तळेकर, कृती समिती उपाध्यक्ष शरद वायंगणकर, सचिव – संजय खानविलकर यांनी केले आहे.












