आमदारांच्या हस्ते उदघाटन ; तरीही कणकवली भाजी मंडई तील पब्लिक टॉयलेट विनावापर

आणखी किती दिवस शौचालयावाचून सामान्य नागरिक आणि व्यापारी यांचे हाल करणार ?

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचा सवाल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर हे गजबजले आहे. शहरात सोनगेवाडी मध्ये 80 लाखाचा शोचालय बांधला , शिवसेनेने आवाज उठवला म्हणून दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करून सुसज्ज पर्यटन स्थळ रुपी 80 लाखाचे शोचालय बांधले परंतु गेल्या काही दिवसापूर्वी उद्घाटन होऊन सुद्धा अजूनही शौचालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही त्याचे कारण नगरपंचायत तिने जाहीर करावे की ठेकेदाराची बिल बाकी आहे हे तरी सांगावे येत्या आठ दिवसात शौचालय चालू न केल्यास शिवसेना स्टाईलने आम्ही चालू करू व शहरातील नागरिक आणि महिलांचं शौचालय जाण्याचा अडचण दूर करू असेही जाधव यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!