कुमारी गट २९ सप्टेंबर कुडाळ येथे तर कुमार गट ३० सप्टेंबर सावंतवाडी येथे
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कबड्डी फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणारी कुमार/ कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले .याप्रसंगी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे संजय पेडणेकर,मार्टिन आल्मेडा,दिनेश चव्हाण,अजय जाधव,वैभव कोंडस्कर आदी मान्यवर उपस्थित होते .कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता कुडाळ हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेली आहे .तर कुमार गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी बुधवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता सावंतवाडी आरपीडी हायस्कूल येथे निश्चित करण्यात आलेली आहे
सदर निवड चाचणी मध्ये सहभागी होणारे संघ हे आपल्या तालुका कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन ला संलग्न मंडळे, क्लब असणे आवश्यक आहे . वैयक्तिक खेळाडू किंवा शालेय खेळाडू हे ही स्थानिक मंडळाच्या माध्यमातून संलग्न असणे आवश्यक आहे .खेळाडू व संघ नोंदणी अर्ज व्हाट्सअप च्या माध्यमातून संघटनेचे कार्यवाह यांच्याकडे दिनांक २८ सप्टेंबर पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे .स्पर्धा मातीच्या मैदानावर होणार आहेत त्यामुळे ठीक ९:०० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे .खेळाडूंची वजने व कागदपत्रे तपासण्याकरिता जास्त वेळ लागू नये म्हणून सर्वांनी आपापली मूळ व झेरॉक्स कागदपत्रे आणणे बंधनकारक आहे .ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील अशांच्या तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत . २० वर्षाखालील कुमार /कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या कुमार (मुलगे )खेळाडूंची जन्मतारीख ०५/११/२००६ व त्यानंतरची तर वजन ७५ किलो असावे .
कुमारी (मुली ) जन्मतारीख ३०/११/२००६ व त्यानंतरची आणि वजन ६५ किलो आवश्यक आहे .स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी वयाच्या दाखल्याबाबत पुरावा म्हणून १) दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या खेळाडूंनी परीक्षा हॉल तिकिटाची रंगीत छायांकित प्रत द्यावी.२) यावर्षी दहावी व बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरल्यानंतर प्री लिस्ट ची प्रत मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीनिशी द्यावी.३) माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी खेळाडूंसाठी शाळेचा यु-डायस नंबर व स्टुडन्ट आयडी असलेल्या बोनाफाईड व निर्गम उताऱ्यावर खेळाडूच्या फोटोवर मुख्याध्यापकाने अर्धसाक्षांकित केलेले असावे.४) इयत्ता पहिली प्रवेश घेतल्याचा निर्गम उतारा ५) आर.टी.ई.२००९ प्रमाणे प्रवेश घेतला असल्यास प्रथम प्रवेश घेतलेल्या शाळेचा यु-डायस व स्टुडन्ट आयडी असलेला निर्गम उतारा किंवा टीसी ची छायांकित प्रत )६)संबंधित खेळाडूचे वय,१ किंवा ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला.७)संबंधित खेळाडूंच्या वयाची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल तर खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टर ची सत्यप्रत अनिवार्य राहील.यावरील पैकी एका जन्मपुराव्या सोबत खालील एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे.१)आधार कार्ड ची रंगीत छायांकित प्रत व मूळ प्रत.(आधार कार्ड अद्यावत केलेले असावे यामध्ये जन्मतारखेची तारीख/ महिना/ साल स्पष्ट उल्लेख असावा)
आपली संघनिश्चिती प्रवेश अर्जासहित दिनांक २८ नोव्हेंबर पूर्वी संबंधित तालुका कबड्डी असोसिएशनच्या शिफारसीने संघटनेपर्यंत पोहचणे अत्यावश्यक आहे .
निवडलेले दोन्हीही संघ ८ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत विरार मुंबई येथे होणाऱ्या कुमार /कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत .
संघ निश्चिती व अधिक माहिती करीता स्पर्धा संयोजक कुमारी गट (कुडाळ ) वैभव कोंडसकर 9420353947तर कुमार गट (सावंतवाडी )अजय जाधव 9822688467 यांच्याशी संपर्क साधावा .












