माहिती अधिकार कार्यकता संतोष कदम खून प्रकरणी सांगली महापालिकेच्या दोघा नगरसेवकांची चौकशी

कणकवली (प्रतिनिधी) : माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम (रा.सांगली) यांचा पैशाच्या देवाणघेवाणीतून नांदणी भैरववाडी रस्त्यावर त्यांच्याच चारचाकी गाडीत बुधवारी (दि. 7 फेब्रुवारी) खून झाला होता. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. तर खुनात सहभागी असलेल्या आणखी दोन संशयितांचा अद्याप शोध लागलेला नाही. या खून प्रकरणी सांगली महापालिकेच्या दोघां नगरसेवकांची चौकशी करण्यात आली आहे .

खून प्रकरणात मयत संतोष यांच्या पत्नी प्रज्ञा कदम यांनी, सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश मारुती चव्हाण हे गुंड प्रवृत्तीचे असून, खुनात चव्हाण यांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, अशी सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी मागणी केली. त्यामुळंं माजी नगरसेवक चव्हाण यांच्यासह आणखी एका माजी नगरसेवकाची चौकशी इचलकरंजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी चौकशी केली. त्यामुळंं खुनात राजकीय लोकांचा सहभाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!