कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांच्या मार्फत कणकवली तालुक्यात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नगरसेवक वार्ड मधील बिजलीनगर येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मयुरी सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वैदेही गुडेकर, प्रतीक्षा साटम, मिनल म्हसकर व बिजलीनगर परिसरातील महिला उपस्थित होत्या.













