सांगवे,आंबेडकरनगर येथील ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत नागवे – भटवाडी संघ विजेता

प्रमाेद स्पाेर्ट हळवल संघ उपविजेता ठरला

कणकवली (प्रतिनिधी) : नवसंकल्प क्रिडा मंडळ सांगवे,आंबेडकरनगर येथे आयाेजित करण्यात आलेल्या ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नागवे – भटवाडी संघाने प्रथम पारिताेषिकाचा बहुमान पटकावत चषकावर आपले नाव काेरले. तर प्रमाेद स्पाेर्ट हळवल संघ उपविजेता ठरला. स्वराज्य प्रतिष्ठान हरकुळ खुर्द संघाला तृतीय पारिताेषिक देण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज – प्रदीप रासम,उत्कृष्ट फलंदाज – हर्षल परब,मालिकावीर – योगेश मेस्त्री याना हे पुरस्कार देण्यात आले.

पारिताेषिक वितरणावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गाेट्या सावंत उपस्थित हाेते.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार व चषक कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ संदेश उर्फ गोठ्या सावंत (माजी जि.प. अध्यक्ष) संजना सावंत (माजी जि.प. अध्यक्ष) यांच्यातर्फे नागवे – भटवाडी संघाला देण्यात आले.द्वितीय पारितोषिक 7 हजार व चषक. सरपंच संजय सावंत उपसरपंच – अभिजित काणेकर यांच्यावतीने प्रमाेद स्पाेर्ट हळवल संघाला देण्यात आले.तृतीय पारितोषिक 4 हजार व चषक महेंद्र सावंत माजी सरपंच ग्रामपंचायत सांगवे यांच्या सौजन्याने स्वराज्य प्रतिष्ठान हरकुळ खुर्द संघाला देण्यात आले.

error: Content is protected !!