कामाची वर्क ऑर्डर निघाल्यावरच भूमिपूजन अथवा उद्घाटन करावे

श्रेयाच राजकारण करणारे बरेच असतात – खा.विनायक राऊत ; फोंडा – कोंड्ये – करूळ रस्त्याचे भूमिपूजन संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सुमारे १:७५ कोटी रकमेच्या फोंडा – कोंडये – करूळ रस्त्याचे भूमिपूजन खास. विनायक राऊत यांचे हस्ते नुकतेच श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी त्यांचे सोबत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेनाप्रमुख सुशांत नाईक, विधानसभा प्रमुख सचिन सावंत, राजू राठोड आणि स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना खास.राऊत म्हणाले, कुठल्याही कामाचा शुभारंभ व भूमिपूजन कामाचे टेंडर, वर्कऑर्डर निघाल्यानंतर करण्याचे असते. मात्र अज्ञानापोटी काही लोक श्रेयाचं आणि निवडणूक तोंडावर आल्यावर भूमिपूजन चा कार्यक्रम करून घेतात. मात्र जनता सुज्ञ आहे. ती सर्व काही ओळखून आहे.

फोंडाघाट विभागाच्या महिला आघाडी प्रमुख माधवी दळवी, पूर्वा साटम, युवा सेनेचे सिद्धेश राणे, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सुरेश टक्के, श्याम भुवड, कृष्णा एकावडे, राजू साटम, सुनील राणे, प्रकाश सावंत, नितीन एकावडे, प्रथमेश खरात, मयुरेश हुंबे ,मंगेश नेवम, दत्तात्रय राणे, सचिन सुतार, महेश रेवडेकर, राजू साटम, संदीप सुतार,प्रसाद कुबडे, साईनाथ भुवड, चैतन्य सावंत, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते…

error: Content is protected !!