देवगड खाडीपात्रात पडून खलाशाचा मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरात मासेमारी नौकेवर कामाला असलेला युवक दीपक कृष्णा मुळ्ये रा हुंबरट ता. कणकवली हे देवगड येथील खाडीच्या पाण्यात तोल जाऊन पडून मयत झाला असल्याची घटना २९ फेब्रुवारी सायं. ७ च्या सुमारास घडली आहे. देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूचू नोंद करण्यात आली असून या घटनेची फिर्याद ज्योती प्रकाश पवार यांनी देवगड पोलिस स्थानकात दाखल केली आहे .

दीपक मुळ्ये हे दाऊद सोलकर यांच्या अलनाहीद- १ एक या नौकेवर नोकरी करीत होते .२९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ते नापत्ता झाले त्यांच्या मृतदेह १ मार्च सकाळी आढळून आला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहेत

error: Content is protected !!