जिवंत काडतुसंसह रायफल जप्त ; वैभववाडी पोलिसांची हेत गावात कारवाई

पन्हाळा तालुक्यातील दोन युवकांवर गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा नेर्ले मार्गावर हेत येथे मोटारसायकलवरुन विना परवाना रायफल व जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या  दोघांना वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. सागर दगडू नाईक वय ४५ व अभय रणजीत पाटील वय ३०दोघेही  रा.यवलुज महादेव गल्ली. ता.पन्हाळा जि. कोल्हापूर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्यांच्याकडून रायफलसह व मोटारसायकलसह  १ लाख २९  हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दुपारी ३ वा. सुमारास करण्यात आली.

वैभववाडी पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अवसरमोल, पो.नाईक शैलेश कांबळे, जितेंद्र कोलते व चालक कानसे  यांचे पथक भुईबावडा ते नेर्ले या मार्गावर गस्त घालत होते.दरम्यान हेत खिंड येथे दोन इसम मोटारसायकलसह उभे होते. पोलिसांची गाडी बघताच त्यांनी तिथून नेर्लेच्या दिशेने मोटारसायकल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांचा पाठलाग केला. त्यांना हेत येथे पोलिसांनी  पकडले.  त्यांच्या जवळ बोअर रायफल व रिकामे मॕगझीन,सापडले. त्यांच्याकडे याचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे त्यांना वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ७५ हजार रुपये किंमतीची रायफल, ३ हजार रुपयाची काडतुसे, १० हजार रिकामी मॕगझीन, व मोटारसायकल ४० हजार  असा सुमारे १ लाख २९ हजारचा  मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर  हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.

error: Content is protected !!