कासार्डेतील अवैध मायनिंग उत्खननावर तात्काळ कारवाई करा

सुशांत ताम्हणकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आमरण उपोषण सुरू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कासार्डे येथे सिलिका मायनिंग चे काम नियमबाह्य चालू आहे. अवैध रित्या सुरू असलेल्या मायनिंग उत्खननावर तात्काळ कारवाई करावी. या मागणीसाठी कासार्डे येथील सुशांत गणपत ताम्हणकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या सुशांत ताम्हणकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासार्डे येथील सिलिका मायनिंग कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून शासनाने वेळोवेळी मायनिंग संदर्भात ठरवून दिलेल्या नियमानुसार सिलिका उत्खननाचे काम केले जात नाही. याबाबत आपण २५ जानेवारी रोजी उपोषणास बसणार होतो, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केलेल्या शिष्टाई नंतर संबंधित सिलिका मायनिंग कंपनीच्या अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून सदरचे उपोषण स्थगित केले होते. मात्र संबंधित कंपनीकडून दिलेल्या आश्वासनानुसार कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे. असे सुशांत ताम्हणकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तर आपल्या विविध मागण्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरु केले आहे.

प्रमुख मागण्या

मायनिंग संबंधित असलेल्या नियमाची काटेकोर अंबालबजावणी करावी, व सदर अंमलबजावणी न करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी, कासार्डे येथील अवैध मायनिंग उत्खनन चालू असलेल्या ठिकाणांवर कारवाई करण्यात यावी, मायनिंग अक्ट १९५२ व १९५७ नुसार व शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या नियमानुसारच सिलिका मायनिंग चे काम करण्यात यावे. तसेच नियमानुसार काम न करणाऱ्या मायनिंग वर कठोर कारवाई करावी. आदी मागण्या या उपोषणादरम्यान करण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!