कासार्डे तिठ्ठा येथील रस्सीखेच स्पर्धेत म्हाळईदेवी होडावडा संघाला विजेतेपद

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठ्ठा येथे शिवजयंती (तिथीनुसार) निमित्त कासार्डे गाव वाडी मर्यादित व जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली. दशक्रोशीत पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत गाव वाडी मर्यादित रस्सीखेच स्पर्धेत श्री म्हाडकादेवी जांभूळवाडी व जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत म्हाळईदेवी होडावडा, ता.वेंगुर्ले संघाने विजेतेपद पटकावून मानकरी ठरला.

तत्पूर्वी रस्सीखेच स्पर्धेचा शुभारंभ प्रकाश पारकर याच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी संतोष पारकर, प्रणिल शेटये,अमोल केवटे,श्रीपत पाताडे, सत्यवान केसरकर,श्री. सहदेव उर्फ आण्णा खाडये,अशोक मुद्राळे, नारायण कुचेकर,सागर डंबे,प्रकाश तिर्लोटकर, संतोष सावंत, राजेंद्र सावंत, अवधूत शेटये, मुख्य पंच किशोर सोन्सुरकर, हेमंत नाईक, दत्तात्रय मारकड,अवधूत घुले आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान प्रथमच झालेल्या या गाव वाडी मर्यादित रस्सीखेच स्पर्धेत रिक्षा संघटना कासार्डे, जांभूळवाडी (अ),जांभूळवाडी (ब),दक्षिण गावठण, जय सेवालाल, भोगले-पारकरवाडी(अ) व (ब), साटमवाडी, बंडवाडी, उत्तर गावठण संघानी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वच सामन्यात चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या. अंतिम सामना जयसेवालाल कासार्डे विरूद्ध जांभूळवाडी (अ)संघात होत रोमहर्षक लढतीत जांभूळवाडी (अ) संघाने विजेतेपद पटकावले तर जय सेवालाल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

तर जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत म्हाळईदेवी होडावडा, जय सेवालाल य(अ) व (ब) ,बाजारपेठ मित्रमंडळ तळेरे संघांनी सहभाग घेऊन उपस्थितांची मने जिंकली. अंतिम सामन्यात म्हाळईदेवी होडावडा संघाने जय सेवालाल,कासार्डे संघावर मात करीत जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत यश संपादन केला.गाव मर्यादित स्पर्धेत फस्ट मॅन किताब आण्णा खाडये (म्हाडकादेवी जांभूळवाडी) व लास्ट मॅन किताब गोविंद चव्हाण (जय सेवालाल) तर जिल्हास्तरीय स्पर्धेत फस्ट मॅन राजा जाधव व लास्ट मॅन साहिल तळवणेकर (दोघेही होडावडा) याना देण्यात आला. विजेत्या व उपविजेत्या संघाना मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रक्कम व ढाल देऊन गौरविण्यात आले.

error: Content is protected !!