पिडब्ल्युडी चे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचा उद्या वाढदिवस

कणकवली (प्रतिनिधी) : पिडबल्युडी विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सीताराम सर्वगोड यांचा उद्या 31 मार्च रोजी 57 वा वाढदिवस आहे. कार्यकारी अभियंता पदी बढती मिळाल्यानंतर सर्वगोड यांनी पिडबल्युडी कणकवली येथे कार्यभार स्वीकारला.मागील सव्वा वर्षांच्या आपल्या कार्यकारी अभियंता पदाच्या कार्यकाळात सर्वगोड यांनी कणकवली विभागात आजवर नि मिळालेला असा 1 हजार 800 कोटीहून अधिकचा विकासनिधी विविध हेडखाली मंजूर करून आणला आहे. पिडबल्युडी खात्याचा कारभार दर्जेदार आणि गतिमान करतानाच पारदर्शक कारभाराने सर्वसामान्य माणसाच्या मनात सार्वजनिक बांधकाम खात्याची प्रतिमा उजळली आहे. राजकोट किल्ला नूतनीकरण, भारतीय नौसेना दिनी मालवण मध्ये केलेली विकासकामे , एअरपोर्ट च्या धर्तीवर कणकवली, ओरोस रेल्वे स्टेशन चे होत असलेले नूतनीकरण, पंचतारांकित सुविधा असलेली शासकीय विश्रामगृह, अद्ययावत देवगड कोर्ट इमारत, सोनवडे घाट रस्त्याची अलायमेंट फायनल वर्क, टेस्ट लॅब, जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय, कणकवली कनेडी राज्यमार्गाचे नूतनीकरण, जानवली गणपती साना ते सापळे बाग पूल, विजयदुर्ग कासार्डे दुपदरी काँक्रीट रस्ता, कणकवली विभागातील 1200 किमी लांबीपैकी 1 हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे दर्जेदार मजबुतीकरण ही ठळक कामे सर्वगोड यांचे कर्तृत्व सिद्ध करतात. पिडबल्युडी विभागला आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या सर्वगोड यांचा वाढदिवस उद्या सकाळी सध्या पद्धतीने कणकवली विभागीय कार्यालयात साजरा करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!