छत्रपतींच्या गादी चा सर्वाधिक अपमान संजय राऊत ने केलाय
भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा प्रहार
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : संजय राजाराम राऊत याने आज छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महराजांच्या गादीचा अपमान कसा झाला याची मुक्ताफळे उधळत होता. याच संजय राजाराम राऊत ने छत्रपतींच्या गादि चे पुरावे मागून सर्वात मोठा अपमान केला होता. हाच संजय राऊत कोल्हापुरात छत्रपतीं ना जाऊन भेटत भगवी शाल घालतो. तेव्हा कोल्हापुरातील महाविकास आघाडी च्या नेत्यांनी राऊत ला विरोध का केला नाही ? संजय राऊत ला कोल्हापुरात प्रवेश करू देणार नाही अशी भूमिका का घेतली नाही ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. संजय मंडलीक यांचा माफीनामा मागणाऱ्या कोल्हापुरातील महाविकास आघाडी च्या नेत्यांनी तेव्हा संजय राऊत ला जाब का विचारला नाही ? असा रोखठोक सवाल नितेश राणे यांनी केला. स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाचे ज्वलंत प्रतीक होते.तेव्हा बाळासाहेबांच्या भेटीला मातोश्रीवर जाण्यात अमित शहा यांना कमीपणा वाटत नव्हता. आज मात्र मातोश्री ने काँग्रेस चे पाय धरायला सुरुवात केली आहे. तेव्हाची शिवसेना आणि आताची हिंदुत्व विसरलेली उबाठा सेना यात जमीन आस्मान चा फरक आहे. राजनाथ सिंग असो, प्रमोद महाजन आदी भाजपा नेते मातोश्रीवर बाळासाहेबांना आदराने भेटत असत. पण काँग्रेस नेता राहुल गांधी एकदा तरी मातोश्रीवर आले काय ? याचा विचार राऊत ने करावा. संसद चा अवैध ताबा मोदींनी घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याचा समाचार घेताना आमदार नितेश राणे यांनी राऊत यांची चांगलीच चिरफाड केली. मुंबई महापौर बंगला तुझा मालक स्वतःच्या ट्रस्ट च्या घशात घालायला बघत होता ,अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी खा.संजय राऊत यांच्यावर प्रहार केला.











