मालवणी एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत एकांकिका जापसाल – वॉरंट यांची निवड

दिग्दर्शक, लेखक शेखर मनोहर गवस यांची कमाल

लेखक वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर “वॉरंट” आणि लेखक विठ्ठल सावंत “जापसाल” यांच्या संहिता महाअंतिम फेरीत

कणकवली (प्रतिनिधी) : आम्ही मालवणी प्रस्तुत मालवणी एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी कणकवली तालुक्यात ज्येष्ठ रंगकर्मी सुहासजी वरूणकर यांच्या अद्वैत घर नंबर 356 शिवाजीनगर येथे पार पडली यावेळी मान्यवर संभाजी सावंत जेष्ठ नाटककार. सिने अभिनेते गणेश रेडकर, प्रदीप तोंडवळकर संचालक कलेक्टर खत्री साहेब आम्ही मालवणी सतेज दळवी वस्त्राहरणकार गंगाराम गवाणकर आदी उपस्थित होते.

यामध्ये नवरत्न कोकण परिवार प्रतिष्ठानची एकांकिका “जांभूळनात” , अमर जवान क्रिएशन,नेतर्ड ता. सावंतवाडी यांची एकांकिका “वॉरंट” , गणेश कलामंच, कणकवली एकांकिका “जापसाल” , चंद्रभागा प्रोडक्शन कणकवली एकांकिका “नटीचा काय” , जिल्हा परिषद शाळा ओसरगाव नं 1 एकांकिका “आये” , अक्षरशिंधू साहित्यमंच कणकवली एकांकिका “शबय” अशा मालवणी मालवणी भाषेने रूढी परंपरा आणि वारसा जपणाऱ्या संहिता सादर झाल्या याचे परीक्षण अस्सल मालवणी मातीतल्या मालवणीच परीक्षकांनी केले यावेळी परीक्षणाकरिता ज्येष्ठ रंगकर्मी लेखक दिग्दर्शक संभाजी सावंत, तसेच मराठी चित्रपट, मालिका या विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारे गणेश रेवडेकर उपस्थित होते. आपल्या तल्लक बुद्धीने दूरदृष्टीने या सहा एकांकिकांमधून मुंबई येथील होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी कणकवली तालुक्यातील जाणवली येथील सुपुत्र लेखक दिग्दर्शक प्रा.शेखर मनोहर गवस यांच्या दिग्दर्शनातील आणि लेखक वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या लेखनातील “अमर जवान” क्रिएशन नेतर्डे ता. सावंतवाडी निर्माते जगदीश लाडु गवस यांच्या निर्मितीतील “वॉरंट” ही एकांकिका अंतिम फेरी करिता निवडण्यात आली आहे. या मध्ये आपल्या कणकवली तालुक्यातील साईनाथ सावंत सत्यवान गावकर विठ्ठल गावकर मनस्वी जाधव शुभम जाधव सौरभ जाधव संतोष चव्हाण वेदांत जंगले हेमंत समजीसकर प्रणाली म्हसकर असे कलाकार असून या एकांकिके करिता रंगभूषा वेशभूषा शिवानी वर्दम प्रकाश योजना ऋषिकेश कोरडे/ सत्येंद्र जाधव नैपथ्य सत्येंद्र जाधव पार्श्वसंगीत शेखर गवस यांनी केले आहे.तसेच आपल्या कणकवली तालुक्यातील फोंडा गावचे सुपुत्र उत्तम लेखक, दिग्दर्शक, निर्माते विठ्ठल सावंत यांच्या लेखणीतील आणि सरोज विठ्ठल सावंत निर्मित “जापसाल” एकांकिकेंची निवड महाअंतिम फेरीसाठी झाली असून या एकांकिके करिता प्रकाश योजना सत्येंद्र जाधव,ऋषिकेश कोरडे, नैपथ्य सत्येंद्र जाधव, रंगभूषा – वेशभूषा सुहास वरुणकर यांची असून या एकांकिके करिता ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यामध्ये प्राजक्ता नेरुरकर,सत्यवान गावकर, शुभम जाधव, सौरभ जाधव, लीझा जाधव,विठ्ठल गावकर, दूर्वा पावसकर, हेमंत समजीसकर असे कलाकार असून एकाच दिग्दर्शकाच्या दोन संहिता महाअंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या असून कणकवली तालुक्यात तसेच मित्रपरिवार आणि समस्त रंगकर्मींद्वारे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आम्ही मालवणी समूहाचे कर्ते-करविते विठ्ठल सावंत म्हणाले मालवणी भाषा आणि मालवणी माणूस प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावा मालवणी रंगकर्मींना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि याहीपेक्षा मालवणी भाषेला सुगीचे दिवस यावे यासाठी सुरू केलेली ही चळवळ असून येणाऱ्या काही वर्षानंतर त्या स्पर्धेचे आणि आपल्या मालवणी भाषेचे स्थान उच्च पातळीला नेण्याचा आणि मालवणी भाषा अजून विस्तृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करेन असे म्हणाले तसेच तसेच ज्येष्ठ रंगकर्मी सुहासजी वरूनकर यांनी केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांचे तोंडभर कौतुक करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी स. 09 वाजल्यापासून भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर लघु नाट्य गृह, 588 महाजन वाडी, मिरा रोड (पूर्व) ठाणे 400068 येथे होणार असून मालवणी माणसाने मालवणी कलाकारांनी याचा नक्की आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!