एटीएममधून पैसे काढताय तर सावध राहा

तुमच्या पैशावर ही मारला जाऊ शकतो डल्ला

कल्याण (प्रतिनिधी) : एटीएम सेंटरमध्ये येणार्या सर्व नागरीकांच्या पीन नंबर आणि एटीएम घेऊन अनेकांना लूटणार्या सराईत चोरटा दीपक झा याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण स्टेशन परिसरात त्याने-१६ नागरीकांना लक्ष्य केले आहे. त्याच्याकडून विविध बँकाचे-९२ एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दीपक झा याने एका साथीदाराच्या मदतीने किती लोकांना गंडा घातला असेल याचा अंदाज लागू शकतो.

काही दिवसापूर्वी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात दोन महिलांनी तक्रार केली.त्या दोघींची तक्रार एकच होती.त्या दोघी कल्याण मधील एका एटीएम सेंटरमध्ये गेल्या त्यांनी सेंटरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला.त्यांचे पैसे एटीएममधून निघाले नाही. त्यांच्या मदतीसाठी एक तरुण पुढे आला. त्यानेही प्रयत्न केला.पैसे निघाले नाही थाेड्याच वेळात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली आहे. डीपीसी सचिन गुंजाळ,एसीपी कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलैश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी तानाजी वाघ यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.तपास सुरु असतानाच पोलिसांकडे या प्रकरणी-१६-तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांकडे सीसीटीव्ही होता त्या सीसीटीव्हीत दोन तरुण कैद झाले होते.अखेर त्या पैकी एक दीपक झा याला पोलिसानी उल्हासनगरातून अटक केली. त्याचा दुसर्या साथीदाराचा शोध सुरु आहे.दीपक झा याच्याकडून विविध कंपन्याचे-९२ एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दीपक झा याच्या गुन्ह्याची पद्धत अशी होती की, एटीएम बाहेर उभा राहायचा. स्टेशन परिसरात एटीएम सेंटरमध्ये येतात. अनेक जण असे असतात.ज्यांना एटीएम आ’परेट करता येत नाही. त्याची माहिती नसते.अशा नागरीक जेव्हा एटीएममध्ये पैसे काढण्यास जात त्यांना मदतीच्या नावाखाली दीपक झा आणि त्याचा साथीदार आत यायचे. पीन कोड काय टाकला जात आहे. ते पाहून घ्यायचे.नंतर आतमध्ये जायचे हातचलाखी करुन एटीएम बदलून टाकायचे. दुसरा एटीएम कार्ड त्या नागरीकांच्या हाती द्यायचे. डुप्लीकेट एटीएमच्या सहाय्याने पैसे काढण्याचे नाटक करायचे. पैसे निघत नसल्याने नागरीक घरी जायचे.. त्यानंतर दीपक झा आणि त्याचा साथीदार ओरीजनल एटीएमच्या सहाय्याने पैसे काढून घ्यायचे.

error: Content is protected !!