फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री रामनवमी निमित्त 17 एप्रिल रोजी श्री देव पाचोबा देवस्थान डामरे येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 11 श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 ते 3 वाजता महाप्रसाद, दुपारी 3 ते 6 दरम्यान महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी 6 ते 8 वाजण्याच्या दरम्यान होममिनिस्टर स्पर्धा, रात्री 8 ते 10 स्थानिक मंडळांची सुश्राव्य भजने, रात्री 10 ते 12 वाजता राशिवडे, ता. राधानगरी येथील सुप्रसिद्ध बुवा नागेश पाटील यांचे भजन सादर होणार आहे. कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री देव पाचोबा देवस्थान मित्रमंडळ डामरे- फोंडाघाट यांनी केले आहे
रामनवमी निमित्त पाचोबा देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन











