मोदी सरकारच्या सर्व योजना जनते पर्यंत न्या !
धोंडी चिंदरकर यांच्या कार्यशैलीचे नारायण राणें कडून कौतुक
आचरा विभागीय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
आचरा (प्रतिनिधी) : मी आज आहे तो तुमच्या कार्यकर्त्यांनच्या प्रेमामुळे आहे. या प्रेमाची मी परतफेड कधीच करू शकत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गात चांगले वातावरण आहे. मोदी सरकारने 80 कोटी जनतेला मोफत दान्य, 54 विविध प्रकारच्या योजना दिल्या या लोकांन पर्यंत न्या असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी येथे केले. महायुतीचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आचरा जि.प. मतदार संघातली महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा चिंदर येथे अयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले, जगाच्या अर्थव्यवस्थे 5 व्या क्रमांका वर भारताला नेलं, आम्ही चिपी विमानतळ होण्यासाठी प्रयत्न केले मात्र विरोध करणारा विनायक राऊत श्रेय घेण्यास पुढे होता. माझ्या जिल्ह्यातील मुलांसाठी मेडिकल कॉलेज, रस्ते, पाणी, वीज यासाठी आपण प्रयत्न केला. 400 ते 500 लोकांना मुंबईत नोकऱ्या दिल्या हे जनतेला सर्व द्यात आहे. त्यामुळे आमचा विजय अडीज लाख मताधिक्याने निश्चित आहे. धोंडी चिंदरकर यांचेही यावेळी राणे यांनी कौतुक केले. धोंडीचा पूर्वीचा जोश आज बघायला मिळाला आहे. तसेच तालुकास्थरावर करत असलेल्या संघटन कौश्यल्या बद्दल पाटीवर थाप दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ-मालवण मतदारसंघ निवडणूक प्रमुख निलेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी नारायण राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना धोंडी चिंदरकर म्हणाले कि नारायण राणे यांनी पूर्ण कोकण विकासाच्या दृष्टीने पादाक्रांत केले आहे. दहशत वादावर बोलणाऱ्या उबाठा नेत्यांना आमदार वैभव नाईक यांचा दंडूका घेऊन फिरताना फोटो सार्वजनिक करून आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. डॉ. मिलिंद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपले विचार यावेळी मांडले, डॉ. निलेश राणे म्हणाले कि राणे साहेबांवर टीका करणाऱ्या विनायक राऊतांना खासदारकी म्हणजे काय ती कळलीच नाही.
यावेळी पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, माजी सभापती हिमाली अमरे, भाजप महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, शरयू पाटकर, विभागीय अध्यक्ष संतोष कोदे, प्रफुल प्रभू, आचरा विभाग प्रभारी संतोष गावकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर सरपंच नम्रता महंकाळ, पळसंब सरपंच महेश वरक, आचरा उपसरपंच संजय मिराशी, कोईळ सरपंच अरविंद साटम, त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, समिर बावकर, नरेंद्र मेस्त, दत्ता वराडकर, रवि घागरे, राजन पांगे, शशिकांत नाटेकर, दिगंबर जाधव, गणेश तोंडवळकर, अण्णा कोचरेकर, संतोष अपराज, मनोज हडकर, अवधूत हळदणकर, बाबू परुळेकर, शेखर सुतार, सतीश बांदिवडेकर, आशिष बागवे, प्रिया पालकर, जान्हवी घाडी, रवि गावडे, विनोद लबद्धे, मोरेश्वर गोसावी, सानिका चिंदरकर, शेखर कांबळी तसेच महिला वर्ग मोठया प्रमाणात उपस्थिती होता. सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी तर समारोप राजन गांवकर यांनी केले.