दशक्रोशीतील 6 ते 13 वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होण्याचे आवाहन
कासार्डे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे ता. कणकवली प्रशालेत कासार्डे दशक्रोशीतील ६ ते १३ वयोगटातील मुला-मुलींसाठी ५ दिवसीय ‘मोफत बालसंस्कार शिबिर’
आयोजित करण्यात आले आहे.
बुधवार दि.२४ रोजी २०२४ स.८ वा.मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा स. ८.१५ ते ९ वा. परिपाठ, स.९ ते १० आईस ब्रेकिंग,स. १० ते स.१०.२०अल्पोपहार, स.१०.२०ते स.११ वा मनोरंजक खेळ गुरुवार दि.२५ एप्रिल २०२४ रोजी स. ८.३० ते ८.४५ वा. परिपाठ,स.८.४५ ते ९.४५ वा स्टेम लर्निंग, स.९.४५ ते स.१०.०५ अल्पोपहार ,स.१०.०५ ते १०.३५ वा कार्यानुभव, स.१०.३५ ते स.११.३० गीत गायन शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी स.८.३० वा. परिपाठ, स.८.४५ ते स.९.४५ वा ‘हसत खेळत इंग्रजी व इंग्रजी म्युझिकल गेम्स’,स.१०.०५ ते स.१०.३५ वा.-इंग्रजी म्युझिकल व फनी गेम्स,स.१०.३५ ते ११.३० वा. रंगवली शनिवार दि.२७ एप्रिल २०२४ रोजी स. ८.३० वा. परिपाठ,स.८.४५ ते स.९.४५ वा योगासने,स.९.४५ ते स.१०.०५ वा अल्पोपहार, स.१०.०५ ते स.१०.३५ वा. वैदिक गणित, स.१०.३५ ते स.११.३० वा. कराटे आणि रस्सिखेच रविवार दि. २८एप्रिल २०२४ रोजी ८.३० ते ८.४५ वा. परिपाठ,स८.४५ते ९.४५ वा. बालपणीचे खेळ, स.९.४५ ते १०.०५ वा अल्पोपहार, स.१०.०५ ते ११ वा .थ्रीडी शो,स.११ वा मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण व शिबीराचा समारोप संपन्न होणार आहे.
तरी कासार्डे दशक्रोशीतील मुलां-मुलींनी या मोफत बालसंस्कार शिबिर लाभ घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य एन. सी. कुचेकर व पर्यवेक्षक एस.डी. भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.