दोन ते तीन हॅकर मातोश्रीत बसवले होते,आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट
खोटे गुन्हे तयार करण्यात उद्धव ठाकरेंची पीएचडी
कणकवली (प्रतिनिधी) : खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पी एच डी केली आहे.मुख्यमंत्री असताना भाजपा नेत्यांना खोट्या केसेस मध्ये अडकाविण्याचे काम केले.सौ.रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचें फोन टॅप होत होते. रश्मी ठाकरे च्या माध्यमातून मातोश्रीच्या चौथ्या माळ्यावर दोन ते तीन हॅकर बसवले होते.हे संजय राऊत यांनी आपल्या मालकीनीला विचारावे.कोणकोणत्या नेत्यांचे व्हाट्सअप चॅटिंग हॅक करत होते हे सुद्धा आम्हाला माहित आहे.आमच्या जवळ त्याचे पुरावे आहेत. जी कामाला ठेवलेली मूल होती ती याविषयी बोलायला तयार आहेत.वेळ पडल्यास पुरव्यासहित समोर आणु आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊदे असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.
कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेचा खरपूस समाचार घेतला.ते म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाखती मुळे मातोश्री मध्ये बरनॉल चा प्रकार वाढला आहे. छातीच्या गोळ्या आता दोन वेळा घेतल्या जात आहेत.महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील सत्य बाजू शिंदेंनी मांडली आहे. त्यामुळे हात भर फाटल्यानंतर मुख्यमंत्री यांचा निर्णय सरकार चा असतो.हे राऊत सांगत आहेत. भाजपा नेत्यांना खोट्या केसेस मध्ये टाकून अटक करण्याचे काम केले.उद्धव ठाकरेने व मुलाने स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला.हे संजय राऊत यांनी मान्य करावे अशा शब्दात सुनावले.
खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पी एच डी केली आहे. मुद्धाम फडणवीस साहेबांच नाव आणायचं फडणवीस साहेबांना अटक केली असती. तर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर कसे आले असते हे आम्ही पाहिले असते.
ज्यांनी गुन्हा केला नाही त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना हात लावला असता तर भाजपा कार्यकर्ते कसे तांडव करतात ते समजलं असत.प्रवीण दरेकर काय करतात ते तुझ्या भावाला विचार तो त्या बँकेचा संचालक आहे.तू पोलीस सरंक्षण मध्ये फिरतोस म्हणून जाग्यावर आहेत. डरपोक कोण आहे हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ स्वतःच्या मेहुण्याला वाचविण्यासाठी भाजप मध्ये येतो असे सांगायला कोण दिल्लीला गेला होता.असा सवालही केला. संजय राऊत 100 टक्के जेल मध्ये जाणार. हे मी जबाबदारीने सांगतोय.मात्र आज पर्यंत संजय राऊत ने जबाबदारीने जे जे सांगितले ते कधीच खरे झाले नाही.
वय संजय राऊत च्या मालकाच झाला आहे. कधी वर जातो हे आम्ही पाहतो. एक पाय कबर मध्ये गेला आहे. कुठच्या तरी सभेमध्ये छातीला हात लावून खाली कोसळेल समजणार पण नाही.अशा शब्दात राऊत यांनी श्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिले. राणेंच्या दादागिरीची भाषा राऊत ला माहीत आहे. राणेंची सभा असताना बाथरूम मध्ये लपून बसलेला,चड्डी पिवळी झाली होती. अस उद्धव व राज साहेबांना फोन करून बोलावून घेतले हेते असे एक उदाहरण यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले.