महिलांनी आरोग्याकडे लक्ष दिल्यास, ती संसाराचा गाडा व्यवस्थित चालवु शकेल- डॉ. अश्विनी कराडे

अशा आरोग्य चिकित्सा शिबिराचा महिलांनी जरूर लाभ घ्यावा– सरपंच सौ संजना आग्रे.

उमंग चाईल्ड ट्रस्ट आणि भारत पेट्रोलियम तर्फे फोंडाघाट मध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : घरातील कर्ती एक स्त्री निरोगी असेल तर, सर्व कुटुंब निरोगी राहते. स्वतःच्या संसारात ती सर्व सदस्यांची काळजी घेण्यात, एवढी व्यस्त असते की, तिच्या स्वतःच्या आरोग्याकडे तिचे लक्ष नसते. त्यामुळे तिच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास ती संसाराचा गाडा व्यवस्थित चालवु शकेल. यासाठी आम्ही कोकणात ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्य विषयी जागृती होण्यासाठी हे मोफत कॅम्प आयोजित करून त्यांना पोषण किट देत आहोत. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. आणि निरोगी जीवन जगावे.यासाठी फोंडाघाट मधील कोकणी जनतेने प्रेमळ आणि उदंड प्रतिसाद दिला आहे. असे कौतुकोदगार उमंग चाइल्ड ट्रस्टच्या डॉक्टर अश्विनी कराडे यांनी काढले ..

उमंग चाइल्ड ट्रस्ट आणि भारत पेट्रोलियम पुरस्कृत फोंडाघाट मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सौ. तन्वी मोदी आणि श्रीपाद म्हापसेकर यांनी, पूर्णानंद हॉलचे सर्वेसर्वा सुरेश सामंत यांचे सहकार्याने केले होते. शिबिराचे उद्घाटन श्रीगणेशाला पुष्पहार अर्पण करून सरपंच सौ. संजना आग्रे आणि डॉ. कराडे तसेच मान्यवरांचे हस्ते दीप-ज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी उपस्थित डॉ. अनिल हेऊर डॉ. जयंत मेंडोज, आशा सावंत, सौ. चव्हाण, सुरेश सामंत, वैशाली म्हापसेकर तसेच सहकार्य करणाऱ्या सीमा कदम, मानसी सावंत, आशा सेविका, अंगणसेविका इत्यादी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना सरपंच सौ. संजना आग्रे यांनी महिलांना आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष न दिल्यास, आजार वाढतो आणि घर आजारी होते. त्यामुळे सहा महिन्यातून एकदा तरी महिलांनी प्रकृतीची सर्वांगीण तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आणि अशा शिबिराचा लाभ घेतल्यास पैशाबरोबरच वेळेची बचत होऊन योग्य मार्गदर्शन लाभते. असे आवाहन केले आणि शुभेच्छा दिल्या. सुरेश सामंत यांनीही शुभेच्छा देताना, गावाच्या विकासाच्या उपक्रमांना आमचा हॉल आणि माझ्याकडून योग्य प्रतिसाद मिळेल असे आश्वासन दिले. त्यानंतर शिबिराच्या तपासणीचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जोईल यांनी तर आभार प्रदर्शन तन्वी मोदी यांनी केले. शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळताना, सुमारे पंचक्रोशीतील ४५० महिलांनी आरोग्य चिकित्सेचा आणि पोषण किट चा लाभ घेतला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!