राजापूर राजीव गांधी मैदानावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आवाहन
कुडाळ (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीचे लोकप्रिय कार्यसम्राट उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी राजापूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, दीपक केसरकर, उद्याेग मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार शेखर निकम, प्रमोद जठार, बाळ माने, यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत
महायुतीच्या सर्व सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी कोकणच्या मतदारांसमवेत प्रचंड संख्येने उपस्थितीत रहावे. उद्या शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजता राजीव गांधी मैदान राजापूर येथे ही प्रचारसभा होणार आहे.












