हरकुळ खुर्द मधील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाठामध्ये पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : खा विनायक राऊत यांच्या कनेडी येथील झालेल्या प्रचारसभे दरम्यान हरकुळ खुर्द मधील भाजप कार्यकर्ते प्रशांत रासम, किशोर कासले, भाई दळवी, वेदांत परब, नंदादीप रासम यांनी खा. विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत ( ऊ बा ठा ) जाहीर प्रवेश केला.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, गौरीशंकर खोत, महिला जिल्हा प्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!