वैभववाडी (प्रतिनिधी) : सोनाळी वाणीवाडी येथील अनिल गजानन पाडावे रा. सोनाळी वाणीवाडी हे बुधवार सकाळ पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे भाऊ रघुनाथ गजानन पाडावे यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत दिली आहे.
अनिल पाडावे यांचा वैभववाडीत पान पटी स्टॉल आहे. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे वैभववाडी जाण्यासाठी घरातून निघाले.दुपारी त्यांचा मुलगा कॉलेज मधून सुटल्यानंतर स्टॉल वर आला. त्यावेळी त्याला स्टॉल बंद दिसला. स्टॉल बंद असल्यामुळे त्याने वडिलांच्या मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मोबाईल बंद येत होता.त्यांची मोटर सायकल एस टी बस स्थानकच्या बाहेर उभी करून ठेवलेली सापडली.याबाबत मुलांनी घरी माहिती दिली. कुटुंबियांनी त्यांना सगळीकडे शोधले मात्र ते कुठे सापडले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी त्यांचा भाऊ रघुनाथ यांनी पोलीस ठाणेत भाऊ बेपत्ता झालेची तक्रार दिली आहे.
तक्रारी नंतर पोलिसांनी वैभववाडी शहरातील सीसीटीव्ही तपासले असता वैभववाडी बस स्थानकातून सकाळी ते पुणे एसटी बस मध्ये चढताना इथून आले आहेत.अधिक तपास पोलीस करीत आहेत












