देशात हुकूमशाही राजवट आणण्याचे भाजपा चे षढयंत्र – विनायक राऊत

“मशाल पेटवा, गद्धारी हटवा “

फोंडाघाट (प्रतिनिधी) : भाजपाच्या राजकारणामध्ये फक्त कपट कारस्थान आहे.या देशातील बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान , घटना संपवण्याचे आणि लोकशाही वर अधिराज्य निर्माण करायचे आणि लोकशाही संपवुन, स्वतःची हुकूमशाही राजवट,एकाधिकारशाहीची राजवट या १४३ कोटी जनतेवर लादायचे षढयंत्र भाजपा चे आहे. असे प्रतिपादन रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांनी केले.ते फोंडाघाट येथील शिवसेना इंडिया आघाडी च्या जाहीर सभेत बोलत होते.

दरम्यान यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते गौरीशंकर खोत, संजय घाडी, अतुल रावराणे, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत , युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक चेअरमन सतीश सावंत , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर,आप चे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर,महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव , दत्ताराम फोफे, काशीराम राणे, शिवसेना महिला नेत्या संजना घाडी मॅडम,उबाठा शिवसेना महिला तालुका प्रमुख माधवी दळवी,संजना कोलते काँग्रेस कार्यकर्ते संतोष टक्के, अरुण म्हसकर, आबू पटेल आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित आघाडी च्या कार्यकर्त्यांना कणकवली तालुकाध्यक्ष प्रथमेश सावंत,युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक,आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना नेते गौरी शंकर खोत, महिला नेत्या संजना घाडी आदिनी आपले विचार व्यक्त करत उपस्थिताना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना विनायक राऊत पुढे म्हणाले,एकाधिकारशाही राजवटीची सुरुवात आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुरू झाली आहे.आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८४ ग्रामपंचायतीवर आता सिडकोचे राज्य येणार आहे. सुदैवाने फोंडाघाट ग्रामपंचायत यामध्ये येत नाही. पण या २८४ ग्रामपंचायतींवर सिडकोचे राज्य आणून तेथील मोकळी जमीन ताबात घ्यायची, असे या सरकारचे षडयंत्र आहे.पूर्वी मुंबई सौराष्ट्र मध्ये होती पण आपल्या लोकांनी बलिदान देऊन मोरार्जींच्या गोळ्या खाऊन मुंबई मिळविली.पण ती मुंबई पुन्हा एकदा गुजरातला जोडायची म्हणजे मुंबईतील मराठी माणूस हद्दपार करायचा आणि मराठी माणूस उध्वस्थ करण्यासाठी या कपटी कारस्थानासाठी, उद्धव ठाकरे यांना संपविण्याचा, तसेच शरद पवार साहेबांना संपण्याचा भाजपाने प्रयत्न केला आहे.आणि हे पाप एकनाथ शिंदे यांचे माध्यमातून केले जात असून याचेच उदाहरण म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून कोकण आणि धनुष्यबाण याचे असणारे नाते पूर्णपणे साप पुसून टाकले आहे. आणि तर नारळ -कोकण आणि धनुष्यबाण याचे असणारे नाते पूर्णपणे साफ पुसून टाकले आहे. एवढेच नव्हे तर ज्यांच्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ,स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचा प्रचार पत्रिकेवरील फोटो दिल्लीश्वराच्या आदेशाने काढायची नामुष्की तुमच्यावर येते ही खेदाची बाब आहे.

नारायण राणे यांनी प्रत्येक निवडणुकीत कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडून द्या— पुन्हा एकदा निवडून द्या,म्हणत नारायण राणे यांनी आपलाच विकास केला. त्याची कित्येक उदाहरण आहेत. कणकवली तालुक्यातील बेळणे या गावी १९९९ मध्ये महसूल मंत्री असताना ऑइल मिल सुरू करण्याचे आश्वासन देत कासार्डे ,सांगवे ,लोरे, ओझरम, वाघेरी या गावातील सुमारे ५०० एकर जागेवर शेतकऱ्यांना पामतेलाची झाडाची लागवड करण्यास लावले. मात्र दुर्दैवाने या अपशकुनी माणसाच्या हातून नारळ फुटून बांधलेली साईराज ऑइल मिल आजतागायत सुरू झाली नाही.तसेच येथील ऊस शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी काँग्रेस चे माजी आमदार विजय सावंत यांनी शेकडो कोटी रुपये खर्च करून साखर कारखाना काढायच्या तयारीत असताना नारायण राणे यांनी आपल्या बायकोच्या हट्टपायी बायकोच्या नावाने काढलेलाच कारखाना झाला पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने विजय सावंत यांचा होणारा साखर कारखाना तुम्ही रद्द करायला लावला. आणि तुम्ही पण साखर कारखाना केला नाही. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होऊन आता मोठ्या प्रमाणात होणारी ऊस शेती ही कमी झाली आहे. असे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले .

आज फोंडाघाट येथे झालेल्या जाहीर सभेला फोंडाघाट विभागातील असंख्य कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उबाठा शिवसेनेचे उपतालुकाध्यक्ष राजू रावराणे यांनी केले.

error: Content is protected !!