स्वप्नील धुरी यांची शिवसेना (उ.बा.ठा ) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा  मतदार संघाच्या “सडेतोड वक्ता” पदी नियुक्ती

वैभववाडी (प्रतिनिधी) : उ.बा.ठा शिवसेनेचे युवा जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांची शिवसेना (उ.बा.ठा ) रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा  मतदार संघाच्या सडेतोड वक्ते पदी निवड करण्यात आली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून पत्रक काढत शिवसेना नेते तथा सचिव अनिल देसाई यांनी  नियुक्ती जाहीर केली आहे. स्वप्नील धुरी हे दहा वर्षांपासून शिवसेनेचे काम करत आहेत. या आधी त्यांनी युवासेनेचे तालुकाप्रमुख ते आता युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस म्हणून काम करीत आहेत.

उत्तम संघटन कौशल्य तथा अभ्यासपूर्ण आक्रमक भाषणशैली त्यांची पक्षाने दखल घेतली आहे .पक्षाकडून मिळालेल्या नवीन जबाबदारीला संधी समजून काम करणार आणि  संधीच सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे धुरी यांनी नियुक्तीनंतर सांगितले .पक्षाने विश्वास दाखवत संधी दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खा. विनायक राऊत,शिवसेना सचिव अनिल देसाई, शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई ,उपनेते अरुणभाई दुधवडकर, उपनेत्या जान्हवी सावंत यांचे धुरी यांनी आभार मानले.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!