लोरे नं 1 गावात विनायक राऊत यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा झंझावाती प्रचार

लोरे नं 1 गावात मशाल निशाणीला मताधिकक्य देणार – अनंत पिळणकर

फोंडाघाट (प्रतिनिधी) : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी लोरे नंबर 1 येथे घरोघरी फिरून प्रचाराचा झंझावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिणळकर यांनी केला.लोरे नं 1 गावातील प्रत्येक घरोघरी जात अनंत पिळणकर यांनी विनायक राऊत यांचा प्रचार केला. विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षांत केलेली विकासकामे, लोकोपयोगी कामे मगदारांपर्यंत पोचवत अनंत पिळणकर यांनी राऊत यांचा प्रचार केला. प्रचारादरम्यान मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले मत विकासाला आपले मत राऊत यांच्या मशाल निशाणीला असे सांगत प्रतिसाद दिला. यावेळी चंद्रशेखर रावराणे, निलेश रावराणे, रमेश रावराणे, विशाल रावराणे, देवेंद्र पिळणकर, तेजस पिणळकर ,प्रीतम रावराणे, योगेश रावराणे, जय रावराणे, स्वप्निल रावराणे, विजय राणे, सुजल शेलार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!