बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाचा “दैव जाणींले कुणी” नावाचा नाट्य प्रयोग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर देऊळवाडी श्री देव रामेश्वर मंदिर येथे प्रतिवर्षी प्रमाणे बुधवार दिनांक 8 मे रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ चिंदर यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी 8:00 वाजता शिवलिंगावर अभिषेक, सकाळी 10:00 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12:00 ते 2:00 तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद, सायंकाळी 3:00 ते 6:00 – महिलांनसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 6 वाजता सत्यनारायणाची आरती व श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ (चिंदर देऊळवाडी) यांचे सुस्वर भजन, रात्रौ ठीक 10:00 वाजता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ (कवठी) यांचा दणदणीत नाट्यप्रयोग “दैव जाणीले कुणी” सादर होणार आहे. तरी भाविकांनी तीर्थप्रसाद, महाप्रसादाचा लाभ घ्यावा व नाट्य रसिकानी नाट्य प्रयोगचा आनंद घ्यावा असे आवाहन देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ चिंदर यांनी केला आहे.












