खारेपाटण मध्ये जलजीवन मिशन चे काम निकृष्ट दर्जाचे

खारेपाटण शहरातील मुख्य पाईप लाईन लिकेज तर ठेकेदाराचे दुर्लक्ष

नागरिकामध्ये तीव्र नाराजी …

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जलजीवन मिशन च्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या बऱ्याच वर्षापूर्वीच्या जलवाहिण्या दुरुस्त करून नव्याने पाईप लाईन टाकून देण्याचे काम सर्वत्र सुरू असतानाच ऐन तोंडावर पाऊस आला असतानाच देखील खारेपाटण मध्ये हे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू असून या कामाचे ठेकेदार यांच्या बेजाबदारपणामुळे व दुर्लक्षितपणामुळे त्यांनी नव्याने बसविलेल्या नळाच्या मुख्य पाईप लाईन या लीकेज होत असून पाण्याचा उपव्यय होत आहे.याकडे संबधित काँट्रेक्टर चे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसत असून याबाबत ग्रामस्थामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे खारेपाटण ग्रामपंचायतीची सुमारे ४० वर्षापूर्वीची संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी जुनी नळ पाईप लाईन शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत काढून टाकून नवीन पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्याचे काम काही प्रमाणात करण्यात आले.मात्र जे काम मुख्य पाईप लाईन चे प्राधाण्याने करण्यात आलेले खारेपाटण हायस्कूल रोडच्या बाजूने खारेपाटण बाजारपेठ दिशेने आलेली पाईप लाईन यापूर्वी दोनदा लिकेज झाली होती.तर दोन दिवसापूर्वीच खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर भर रस्त्यावर लीकेज झालेल्या या पाईप लाईनमुळे पाणी वाया जात होते. मात्र या घटनेकडे या कामाचे ठेकेदार बिपिन कोरगावकर यांनी काम.निकृष्ट दर्जाचे केलेले असून या संपूर्ण कामाकडे सपशेल दुर्लक्ष केले असल्याचा आरोप खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी केला आहे.

वास्तविक पाहता जलजीवन
मिशन अंतर्गत करण्यात येणारे खारेपाटण ग्रामपंचायती चे काम हे अद्याप पूर्ण झालेले नसून हे काम चालू असतानाच त्यामध्ये बसविलेल्या जलवाहीण्यामध्ये आलेले लिकेज हे ठेकेदार यांनी काढणे बा धनाकरक असतानाच गेलीं दोन दिवस खारेपाटण ग्रामपंचायतीचे चार कर्मचारी दिवस रात्र काम करून जमिनीत खड्डा मारून लिकेज शोधण्याचे काम करत आहे. यावरून हे दिसून येते की, सबंधित कामाचा ठेकेदार बिपिन कोरगावकर याना खारेपाटण नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे काही सोयर सुतक नसल्याचे देखील श्री रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले.

तरी सबंधित ठेकदारची आपण लवकरच ग्रमस्थांच्या वतीने तक्रार करणार असून वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी करण्यात यावी व त्याने केलेल्या कामाची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी केली आहे.

error: Content is protected !!