खा.नारायणराव राणे यांची युवा उद्योजक अचित कदम यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावचे सुपुत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांची वरवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक अचित कदम यांनी ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले. यावेळी मंदार मेस्त्री, सागर राणे उपस्थित होते. कमळ निशाणीवर खा. नारायणराव राणे यांच्या माध्यमातून भाजपाने प्रथमच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात खा.राणे यांच्या वरवडे गावाने मतदानात लीड देत आपल्या गावातील सुपत्राच्या विजयात हातभार लावला होता.खा. राणे यांच्या विजयासाठी अचित कदम यांनीही गावातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मेहनत घेत प्रचार केला होता. खा. नारायणराव राणे यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करताना अचित कदम यांनी वरवडे गावातील विकासकामांसाठी प्राधान्याने विकासनिधी देण्याची मागणी केली. माझ्या वरवडे गाववासीयांनी मला नेहमीच साथ दिली. गावविकासासाठी नेहमीच सढळ हस्ते सहकार्य केले आहे आणि यापुढेही असणार असल्याचे खा. राणे यांनी ग्वाही दिली.

error: Content is protected !!